Saturday, January 21, 2017

hello how r u

एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी!!
मी तर बरेच जन्म एकाच जन्मात जन्मले आहे!
आयुष्य आहे हे!!कधी,कुठे,कसे बदलेल!!
माझे ही बदलत आहे!!अगदी मुंगीच्या पावलांनी का होईना बदलते आहे!!...मी स्वागत करतेय या नव्या आयुष्याचं!!
धन्यवाद सुचिकांत,तुमच्यामुळे पुन्हा नव्याने कॉलेज जीवन जगत आहे!!
अभ्यासाचाच पिंडच होता ,पण पूर्णपणे विसरलेले.....तुमच्यामुळे नव्याने शोधलं माझं मीपण पुन्हा!!
मुंबई विद्यापीठात पुन्हा प्रवेश घेतांना जुन्या आठवणी ताज्या झाली. कुर्ला स्थानकावरील नेहमीची उशिराने येणारी ३१८ क्रमांकाची बस, त्या बाजूला असलेल्या देवळातील गणपतीची मूर्ती, नेहमी सर्वत्र हिरवीगार दिसणारी झाडे,थंड हवामान,स्वच्छ रस्ते,कमलनीची न फुललेली पण बघत रहावी अशी फुले ,व्याख्यान कक्षातील पायऱ्या पायऱ्यांच्या मांडणीतील बाक,उपहारगृह.छे!छे!!कॅन्टीन ..त्यातील खिडकीच्या बाजूची खुर्ची!!...
माझं प्रेरणास्थान,माझा भाई!! खूप खुश!!ज्ञानभाषा वरील मान्यवर व्यक्तींच्या ही शुभेच्छा लाभल्या!!...खूप धन्यवाद!!!....अवघड आहे सर्व!!!पण पेलवेन!!!
सुभाष,कळी,सायली,सर्व पाठीशी उभे राहायला